प्रतिनिधी , परभणी : राज्यातील महावीकास आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला खरा . मात्र महावीकास आघाडीची भूमिका प्रामाणिक असेल तर राज्य सरकारने राज्यातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा आदेश काढावा व विधानसभेच्या येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत भाव मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परभणीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले .
धर्मराज चव्हाण (प्रदेश प्रवक्ता,वंचित बहुजन आघाडी)
