बिलाची होळी करताना पोलिसांनी रोखले
अन्यायकारक उपयोगकर्ता कर रद्दसाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज विभागीय कार्यालयासमोर बिले फाडून निदर्शने केली.
प्रतिनिधी , सांगली : कचरा घनकचरा प्रकल्पाचे कर म्हणून महापालिकेने आकारलेले उपयोगकर्ता कर आकारण्यात आलेला उपयोगकर्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत उपयोगकर्ता कर बिले फाडण्यात आली. उपयोगकर्ता बिलाची होळी करताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. आंदोलनकर्ते कराविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका कार्यालयात शिरले. मागण्यांचे निवेदन उपायुक्त स्मृती पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आले.
गुरूवारी मिरज शहर सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष संतोष माने, सराफ असोसिएशनचे महेश शाह, उपाध्यक्ष जावेद पटेल, विवेक शेटे, धनराज सातपुते, शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील, महेंद्र गाडे, आदी सदस्यांसह नागरिकांनी मिरज विभागीय कार्यालयासमोर उपयोगकर्ता कराविरोधात जोरदार निदर्शने केली.
आकारण्यात आलेले बिले फाडून टाकण्यात आली. बिलाची होळी करताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. संतप्त झालेले कार्यकर्ते कराविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कार्यालयात शिरले. उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देऊन उपभोगता कर रद्द करण्याची मागणी केली आहे .
