प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर- प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफ करावे, या मागणीसाठी भाजपच्या तालुका सरचिटणीस अजित जामदार यांनी तब्बल २५ किलोमीटरचा दंडवत घातला आहे. आघाडी सरकारने याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा, यासाठी श्री करवीर निवासनी अंबाबाई व श्री जोतिबा त्यांना सुबुद्धी देऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली.
