प्रतिनिधी , सोलापूर : प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
त्यावर बोलताना भाजपा आमदार राम सातपुते म्हणाले, “संजय राऊतांच्या आरोपाला कोणी सिरियसली घेत नाही आणि सरकारच्या नाकारतेपणाला झाकण्याची जबाबदारी संजय राऊतांची आहे ते त्यांचं काम करत आहेत. त्याचबरोबर संजय राऊतांच मार्गदर्शन घेण्याची ईडीला आवश्यकता नाहीये,ईडी ही स्वतंत्र संस्था आहे ती त्यांच्या पद्धतीने काम करेल त्यामुळं ज्यांचे दोष नाहीयेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही” असं मत भाजपा आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केलं आहे.
