जनतेज न्युज

जिल्ह्यातील उर्वरित नुकसान भरपाई मिळण्यासाठी रविकांत तुपकरांचे कार्यकर्त्यांचे बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात…

उर्वरित नुकसान भरपाई मिळेपर्यंत माघार नाही – रविकांत तुपकर…

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची घोषणा केली. ही मदत दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची ग्वाही दिली. परंतु दिवाळीचा शिमगा झाला तरी अर्धापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. त्यामुळे ही मदत तात्काळ जमा करावी या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. पंरतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर सत्याग्रह ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.