जनतेज न्युज

संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; महिला पोलिसांनी केले फुगडीचे रिंगण

प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दोन वर्ष कोरोना मुळे पालखी बीड शहरात आली नव्हती यंदा मात्र निर्बंध हटविले गेल्यानं या पालखीचं बीडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. मुक्ताईनगरहून पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते. याच दरम्यान बीडमध्ये दोन दिवसांचा मुक्काम या पालखीचा होतो. या पालखीला तीनशे तेरा वर्षांचा इतिहास आहे. आज वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामात तल्लीन होऊन जयघोषात पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे केले आहे. तर यावेळी महिला पोलिसांना आपला मोह आवरता आला नाही. महिला पोलिसांनी फुगडीचे रिंगण करून पालखीत सहभाग घेतला होता.