जनतेज न्युज

संस्थाचालक अर्धनग्न फिरत असल्याचा शिक्षिकांचा आरोप, तर वाद मिटवण्यासाठी आलेल्या आमदारांना संस्थाचालकांना ठेवलं ताटकळत

प्रतिनिधी , कोल्हापूर: कोल्हापुरातील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव हे शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत त्यांच्यासमोर अर्धनग्न फिरत असल्याचा प्रकार करत आहेत. असा आरोप शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी केला त्यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती आणि शिक्षक आमदारांना संस्थाचालकांनी गेटवरच ताटकळत ठेवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.दरम्यान शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी संस्थेला भेट दिली. शिक्षकांचा संताप पाहून त्यांनी देखील संस्थाचालकांची कान उघडणी केली. मात्र संस्थाचालकांनी जवळपास तासभर आमदारांना गेटवर ताटकळत ठेवलं.