जनतेज न्युज

आंदोलन करणाऱ्या भाजपाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बॅनर लावून उत्तर

प्रतिनिधी , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर महिलेवर अत्याचार झाल्याचा गुन्हा औरंगाबाद येथे दाखल झाला आहे परंतु महेबूब शेखवर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.असे असताना देखील भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने महेबूब शेख यांना अटक करावी या मागणीसाठी ठाण्यात आंदोलन करण्यात आले.या आंदोलन करणाऱयांना भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना उत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस ओमकार माळी व ठाणे शहर अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या वतीने ” मेक इन इंडिया नाही भाजपाचा रेप इन इंडिया” अशा आशयाचा बॅनर लावून त्यावर काही भाजपाच्या नेत्यांची नावे देखील टाकले आहेत. तुमच्या नेत्यांनी अशाप्रकारचे गुन्हे केले त्यांना शिक्षा देखील झाली तेव्हा कुठे होता आपण तेव्हा का नाही केले आंदोलन असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे