जनतेज न्युज

शिक्षक, शिक्षिकांवर अत्याचार होत असेल तर गय करणार नाही:जयंत आसगावकर

प्रतिनिधी , कोल्हापूर- जय भारत शिक्षण संस्थेत शिक्षक व शिक्षिकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रार माझ्याकडे आली आहे. याची चौकशी येत्या सोमवारी बैठकीत केली जाईल, यातील दोषींची गय करणार नाही, असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिला.

आमदार आसगवकर पुढे म्हणाले, जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थाचालक परशुराम जाधव हे शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अत्याचार करत असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. सर्व शिक्षकांनी माझ्याकडे भूमिका मांडली आहे. त्यानुसार आज मी या ठिकाणी येऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने शिक्षण संस्थाचालकांची, कोअर कमिटीची बैठक येत्या सोमवारी मुख्याध्यापक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, खाजगी शिक्षण मंडळ यासह शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. असे आमदार जयंत आसगावकर सांगितले. तसेच प्रशासकीय यादव सर देखील या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत जे काही आरोप शिक्षकांच्या कडून संस्थाचालकांवर केले गेले, त्याची संपूर्ण माहिती आणि चौकशी केली जाईल. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. असे देखील आमदार जयंत आजगावकर यांनी सांगितले. तर शिक्षकांच्याकडून संस्था चालकांवर आरोप झाले असतील तर त्याची देखील चौकशी या बैठकीत केली जाईल. यातून शैक्षणिक व्यासपीठ योग्य न्याय-निवाडा करेल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा देखील आमदार आसगावकर यांनी दिला.