जनतेज न्युज

सचिन वाझे प्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सावध प्रतिक्रिया.

प्रतिनिधी , ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार हे आज कोरोनाच्य पार्श्‍वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठकीसाठी धुळे दौऱ्यावर आले असता झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभर यामध्ये गाजणाऱ्या सचिन वाझे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, या प्रकरणासंदर्भात आपली तपास यंत्रणा तपास करीत असून त्यातून निष्पन्न होणाऱ्या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य ती कारवाई करतील अशी सावध प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

सचिन वाझे यांच्या प्रकरणावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, शरद पवार हे राज्यातील जेष्ठ नेते आहेत, त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याबाबत आपण बोलणार नाही, मात्र तपासातून समोर काही येत नाही तो पर्यंत प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही अशी सावध प्रतिक्रिया ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.