प्रतिनिधी , सर्व शासकीय खात्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी गट- ड चतुर्थ श्वेर्णी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्रच्या जालना शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध मागण्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी कार्यलयात देण्यात आले.
