जनतेज न्युज

सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे अंध शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून अन्नदानाचा कार्यक्रम

सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद हिंद सामाजिक संस्था वबिइंग ह्युमन गाईज पुणे शहराच्यावतीने पुणे अंध शाळेतील विद्यार्थ्यांसमवेतकेक कापून  अन्नदानाचा  कार्यक्रम

प्रतिनिधी : पुणे , पुणे बिइंग ह्युमन गाईजचे संस्थेचे संस्थापक बॉलिवूड अभिनेता व समाजसेवक सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद हिंद सामाजिक संस्था व बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराच्यावतीने कोरेगाव पार्कमधील पुणे अंध शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून  अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

यावेळी बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराध्यक्ष जावेद खान व असिफ खान यांच्याहस्ते अन्नदान करण्यात आले . तसेच पुणे स्टेशन परिसरातील गरीब गरजुंना थंडीसाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन बिइंग ह्युमन गाईज पुणे शहराध्यक्ष जावेद खान व आझाद हिंद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असिफ खान यांनी केले .

यावेळी यासिन शेख , सुजित यादव ,बिबिषण जाधव ,  जमसू शेख , राजेश गायकवाड , अविनाश मोरे , वसंत ननवरे , मल्लेश बरडी , केंडल मदरू , वसीम शेख , आशा झवेरी , गौरी ठाकूर , रुबिना खान , उषा गायकवाड , जया मोडकर , गौरव खुणे , लियाकत शेख , राजेश प्रजापती , सुनिल यादव , गोपी कसोटे , प्रशांत पाडळे आदी उपस्थित होते . 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.