प्रतिनिधी , सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात स्थायी सभापती पांडुरंग कोरे आणि नगरसेविका स्वाती शिंदे यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभाग 1 च्या सभापती लक्ष्मी सरगर, नगरसेविका भारती दिगडे, सहाय्यक आयुक्त एस.एस. खरात, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सिराज नायकवडे, श्रीपाद बासूदकर , रवींद्र केसरे, सुनिता इनामदार यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
