जनतेज न्युज

सांगली सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

प्रतिनिधी , सांगली : मुंबईतील पीडित महिलेला न्याय मिळावा व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात एफआयआर नोंद व्हावी तसेच मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व या घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय मुख्यमंत्री यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा या मागणीसाठी आज भाजप महिला आघाडीतर्फे अप्पर तहसील कार्यालय सांगली याठिकाणी निदर्शने करण्यात आली यावेळी नगरसेविका ऍड स्वाती शिंदे व भाजप महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,,,