जनतेज न्युज

सांगलीचे माजी आमदार आणि भाजपाचे जेष्ट नेते पैलवान संभाजी आप्पा पवार अनंतात विलीन झाले आहेत,

वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी मध्यरात्री निधन झाले.शहरातील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

प्रतिनिधी , कुस्ती आणि राजकिय क्षेत्रात दबदबा राहिलेले सांगलीचे माजी आमदार, बिजलीमल्ल पैलवान संभाजी पवार आप्पा यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विरोधक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली,4 वेळा त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून विजय मिळवला होता. 3 वेळा संभाजी पवार यांनी जनता दलाचे आमदार आणि 1 वेळा भाजपाचे आमदार म्हणून सांगली विधानसभेत सांगलीचे नेतृत्व केले होते.त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर संभाजी पवारांचे दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतकांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती.दुपारी 12.30 त्यांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
शहरातील प्रमुख मार्गावरून मारुती चौका पर्यंत ही अंत्ययात्रा निघाली,यानंतर त्याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी अंतींम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.मोठया संख्येने निरोप देण्यासाठी सांगलीकरांनी गर्दी केली होता.अमरधाम स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले,पृथ्वीराज पवार आणि गौतम पवार या दोन्ही मुलांनी संभाजी पवारांच्या पार्थिवाला अग्नी दिली.
यावेळी भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सह काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना व इतर पक्षातले राजकीय नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.