जनतेज न्युज

साई मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार शिवसेनेच्याअनिता जगताप..

प्रतिनिधी : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील साईभक्त हे शिर्डीला येत असतात परंतु कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दीड वर्षापासून साई मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे शिर्डीसह सर्व पंचक्रोशीतील अर्थकारणाला फटका बसला आहे. त्यामुळे तात्काळ मंदिर सुरू करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता जगताप यांनी व्यक्त केले आहे. यासाठी लवकरच शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अनिता जगताप यांनी सांगितले की शिर्डी की येणाऱ्या साई भक्तांची संख्या कमी झाली आहे साई भक्त हा शिर्डीच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शिर्डीचे अर्थव्यवस्था कोलमडली आई साईभक्त शिर्डीत येत असल्याने येथील हॉटेल व्यवसाय हार, फुल, फोटो,मुर्ती,आदींची दुकाने रिक्षा, टुरिस्ट वाहन व्यवसाय किराणा शेतमाल किंवा शेकडो हातावर पोट भरणारे शिर्डी परिसरातील 40 गावांची ग्रामस्थ बेरोजगार भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. हे सर्व व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आता गुजरात सरकारच्या धर्तीवर मंदिरे सुरू केली पाहिजे असे जगताप यांनी बोलून दाखवले.