प्रतिनिधी , शिर्डी जिल्हा अहमदनगर : पवित्र स्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान परिसरात व श्री साईबाबांच्या समाधीजवळ दर्शनाला जाताना भारतीय संस्कृती जपत वेशभूषा करुनच प्रवेश करावा , अशी विनंती करणारे फलक श्रीसाईबाबा संस्थानने नव्याने लावले आहेत . श्री साईबाबांच्या दर्शनाला देश – विदेशातून साईभक्त येत असतात , श्री साईबाबांचे मंदिर हे पवित्र स्थान असून संस्थान परिसरात व मंदिरात दर्शनाला जाताना अनेक साईभक्त हे आपली वेशभूषा पर्यटनस्थळ असल्यासारखे करतात वेगवेगळ्या वेशभूषा काही साईभक्त मंदिर परिसरात किंवा मंदिरात पूर्वी जात होते मात्र मंदिरात जाताना व परिसरात जाताना प्रत्येक साई भक्ताने पुरुष असो महिला असो त्यांनी भारतीय संस्कृती नुसार आपली वेशभूषा ठेवावी , असे फलक साई संस्थानच्या वतीने लावण्यात आलेत.मात्र या फलकावरील अक्षरे फार छोटी असल्यामुळे ते सहजासहजी साईभक्तांच्या लक्षात येत नाही , त्यामुळे साईबाबा संस्थानने हेच फलक मोठ्या अक्षरात व मोठे करून व संस्थान परिसरातील प्रवेश द्वारा बरोबरच साई संस्थान च्या प्रसादालय , निवास्थाने आदी महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत , अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी याबाबत अधिक माहिती दिलीये..
भारतीय पेहराव नसल्यास शिर्डी मध्ये प्रवेश मिळणार नाही
मंदिरात येणा-या भाविकानी भारतीय पेहरावमध्येच दर्शनाला यावे असे मंदिर प्रशासनाने नियम केल्याची माहिती मिळत आहे. ह्या निर्णयाचे मंदिर प्रशासनाकडून फलक लावण्यात आले आहेत.
