प्रतिनिधी, सातारा : सातारा नगरपालिकेच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या मंगळवार पेठ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण गेल्या अनेक वर्षापासून रखडले असल्याने तेथील डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनीदेखील वारंवार मागणी केली होती. त्यामुळे त्या रस्त्याचे काम मंजूर देखील झाले असले तरी ठेकेदाराच्या मग्रुरी पणामुळे या भागातील रस्ता होत नसल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत.
त्यामुळेच संतप्त झालेल्या महिलांनी आज चक्क सातारा नगरपालिकेच्या दारात डांबर आणि खडी घेऊन ही डांबर खडी नगरपालिका प्रशासनाला भेट दिली आहे. तर, लवकरात लवकर रस्ता न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी आपल्याला बोलताना दिला आहे.
