जनतेज न्युज

बार्शीत काँग्रेसने केले ‘अण्णा जगाओ आंदोलन’

प्रतिनिधी, सोलापूर : अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारेंना जागे करण्यासाठी बार्शीतील युवक कॉंग्रेसच्यावतीने अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. अण्णा हजारेंनी २०११ साली कॉंग्रेसची प्रतिमा मलीन करण्यासाठी जनलोकपाल बील, महागाई, बेरोजगारी यासह विविध मुद्द्यावर कॉंग्रेसविरोधात मोठे आंदोलन केले होते. मात्र मागील आठ वर्षापासून भाजपच्या काळात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढलेली असताना अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केले नाही. त्यामुळे अण्णा हजारे हे भाजपसाठी काम करतात असा आरोप युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त ‘हम चले अण्णा को जहाने’ हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अण्णा हजारे यांच्या चेहऱ्याची प्रतिकृती खुर्चीवर ठेवत हे निषेध आंदोलन करण्यात आले.