जनतेज न्युज

सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे 26 जून रोजी आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : विवेक विचार मंच व राज्यातील सहयोगी संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्ताने शहरात सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ए.नारायण स्वामी, पद्मश्री मिलिंद कांबळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये 26 जून रोजी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यासाठी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून यात अध्यक्ष दुष्यंत आठवले तर सचिवपदी डॉक्टर बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज रोजी देण्यात आली आहे सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे.