प्रतिनिधी, धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडाळीने उफाळलेला वाद पहाता सर्वसामान्य शिवसैनिक व्यथित झाला आहे. शिवसेनेचे धुळ्यातील उपमहानगरप्रमुख निष्ठावान शिवसैनिकाने शहरातील झाशी राणी चौकात मोठे बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेब, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातुन होणार. असे जाहीरपणे म्हणत मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच भविष्यातही कायम रहातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे बॅनर सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले असले तरी सरकारला धोका नाही, असा ठाम विश्वास निष्ठावान शिवसैनिकांचा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. त्यामुळे यंदाही विठुरायाची आरती ही शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच हस्ते होईल.
