जनतेज न्युज

सावित्रीबाई फुले यांचं कार्य भारतरत्न पुरस्काराच्या पुढचं असून त्यांना भारतरत्न देण्यास माझा पाठिंबा – छगन भुजबळ.

प्रतिनिधी , सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती त्यांच्या जन्मगाव नायगाव मध्ये कोरोनामुळे आज साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली… नायगांव मधील रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती तर त्यांचे घर फुलांनी सजवण्यात आले होते.. आज सकाळी नायगांव मधून सोशल डिस्टन्सचे पालन करत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली…राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,खासदार श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते…
मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…
Vo – सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न पुरस्कार देण्यास माझा पाठिंबा असून सावित्रीबाई फुले यांच कार्य हे भारत रत्न पुरस्काराच्या पुढे आहे…कोरोनाप्रमाणे त्याकाळी असलेल्या प्लेगच्या साथी मधील त्यांचं योगदान आणि सामाजिक,शैक्षणिक कार्य उच्च प्रतीच असल्याच छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले…