जनतेज न्युज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आज बंधारा दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आज बंधारा दिवस साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्यात आज १०८१ बंधारे एकाच दिवशी बांधण्यात आले. जलसंधारणासाठी कुडाळ पंचायत समिती हा उपक्रम दरवर्षी राबवत असते. पाणी संवर्धनाचा विचार लोकांच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजवण्याचा काम पंचायत समिती करत आहे. एकाच दिवशी जास्तीत जास्त बंधारे बांधून लोकांसमोर एक आदर्श कुडाळ पंचायत समिती ठेवत आहे. कोणताही प्रकारचा शासकीय निधी न वापरता लोकसहभागातून एकाच दिवशी १०८१ बंधारे बांधण्याचा उपक्रम पंचायत समिती कुडाळ यांनी राबविला आहे. या बंधाऱ्याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी शेतीसाठी होतो. तर तालुक्यातील भूजल पातळी टिकवण्यासाठी सुद्धा या बंधाऱ्याचा उपयोग होतो. कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो मात्र कोकणात ठराविकच धरण आहेत. त्यामुळे पडलेला पावसाचं पाणी थेट समुद्रात जात. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवते. मात्र पावसाळा गेला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधारे बांधले जातात. जिल्ह्यात दरवर्षी 4 ते 5 हजार बंधारे संपूर्ण जिल्यात बांधले जातात. त्यातून आज एकाच दिवशी कुडाळ तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून व लोकसभागातुन १०८१ बंधारे बांधून बंधारा दिवस साजरा करण्यात आला.