जनतेज न्युज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरांवर ‘लंपी’ आजाराने केले आक्रमन….

शेतकरी चिंतेत,प्रशासनाने मात्र केले दुर्लक्ष
प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीकामासाठी अनेक शेतकरी पशुपालन करीत आहेत. मात्र लंपी आजाराने जनावरांवर आक्रमण केलेले आहे .सध्या जनावरांच्या शरीरावर गाठी, शरीरावरील ग्रंथीला, पायाला, पोळीला सूज आदी सोबतच ताप, अशक्तपणा ही लक्षणे जनावरांत दिसून येत आहेत. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील मांडकुली,भोयाचे केरवडे,घावनळे भागातील पशुपालक चिंतेत सापडले आहेत.मात्र अद्याप कोणतीही या आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केलेल्या नाही आहेत. त्यामुळे शेतकरी पशुपालक आक्रमक झाले आहेत.प्रायव्हेट पशुवैद्यकीय डाॅक्टर आणुन जनावरांवर उपचार करावे लागत आहेत.मोठ्या प्रमाणावर सध्या हा लंपी आजाराचा फैलाव होताना पाहायला मिळते आहे.