प्रतिनिधी , बिलोली : बिलोली इथल्या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती या घटनेचा आज शहरात प्रचंड संताप दिसून आलाय… बिलोली शहरात सर्वपक्षीयांनी एकत्र येत बिलोली बंद पाळत आक्रोश मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. या घटनेचा सखोल तपास करून आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चेक-यांनी केलीय. या आक्रोश मोर्चात हजारो जण सहभागी झाले होते. दरम्यान बिलोली शहरातील या घटनेचा जिल्ह्यात इतरत्रही निषेध व्यक्त केला जातोय…
