प्रतिनिधी , माढा तालुक्यात : एक रक्कमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी आज माढा तालुक्यातील शेतकर्यांनी ऊसाची वाहतूक रोखून आंदोलन केले. टेंभूर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलन केले.
या आंदोलनात साखर कारखानदारांची अंत्ययात्रा काढण्यात आलीय. प्रतिकात्मक तिरडीचे दहन करताना शेतकरी आणि पोलिसांची झटापट झाली. सोलापूर जिल्ह्यातले कारखाने सुरू होऊन दोन महिन्याचा अवधी लोटला आहे तरी देखील अद्याप रक्कम जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याने आता रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केलीय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आता या आंदोलनात उडी घेतलीय. शिवसेना नेते संजय कोकाटे या आंदोलनात सामिल झाल्याने आता सत्ताधारी पक्षांचे नेते देखील शेतकऱयांच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसतहे. 16 डिसेंबर पर्यंत एफआरपी ची रक्कम द्यावी अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा सेना नेते संजय कोकाटे यांनी दिलाय.
