प्रतिनिधी ,पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनील कांबळे यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांना फोन द्वारे दिलेली अश्लील धमकी, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं सुनील कांबळे यांच्या विरोधात उद्या पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार देणार आहोत त्याचबरोबर कांबळे यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरून भाजपाने त्यांचे नगरसेवक पद निलंबित करावं अशी मागणीही महानगरपालिकेत करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलं. सुनील कांबळे यांच्या बिबवेवाडी येथील घरासमोर तीव्र निदर्शने झाली . महिला भाजप नगरसेविका या प्रकरणावर ती गप्प का आहेत. असा सवाल राष्ट्रवादी नगरसेविकेने आंदोलनात उपस्थित केला
