जनतेज न्युज

सुप्रिया सुळेंनी बालिश वक्तव्य बंद करावं.. पंतप्रधान मोदींवरील टीकेला पाडळकरांनी दिलं प्रतिउत्तर

प्रतिनिधी , सोलापूर : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली,
त्यावर सुप्रिया सुळेंनी “दुनिया घूम लो,हमारे पुणे के आगे कुछ नहीं” असं म्हणतं बाहेरच्या लोकांनी कोव्हीड लसीवर क्लेम करू नये असा म्हणत खोचक टोला मोदींना लगावला होता,
मात्र आता त्याला प्रतिउत्तर देताना भाजपा आमदार गोपीचंद पाडळकरांनी सुप्रिया ताई सुळेंना बालिश वक्तव्य बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदींना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे.
सुप्रिया ताई सुळे या लोकसभेच्या सदस्य आहेत त्यामुळं त्यांनी यापुढून बालिश वक्तव्य कारण बंद करावं असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया ताईंना दिला आहे.
गोपीचंद पडळकर हे आज पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ सोलापूर ला आले आहेत.