प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्याचा खोळंबा झाला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शहरी आणि हद्दवाढ भागात पाच ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाणी पुरवठा सुरळीत करावा यासाठी आयुक पी.शिवशंकर यांना भेटून निवेदने दिली आहेत.इतकेच नव्हे तर पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी देखील पाणी पुरवठा लवकर सुरळीत करावा याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.मात्र,अजूनही शहरात पाण्यासाठी वणवण सुरू आहे.सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ भागातील रहेमतबी टेकडी येथे आठ दिवसानंतर पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून आल.पाणी भरण्यासाठी महिलांनी घागरींच्या लांबच लांब रांगा लावल्याच चित्र सध्या सोलापुरात दिसून येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सोलापूरकर महिला रोष व्यक्त करत आहेत.
