जनतेज न्युज

सोलापुरात वाढीव वीजबिल आणि इंधन दरवाढीविरोधात माकपचे आंदोलन

प्रतिनिधी , सोलापूर : लॉकडाऊन दरम्यान सामान्य नागरिकांना भरमसाठ वीज बिल महावितरणाकडून देण्यात आले.या वाढीव वीज बिल आणि वाढत्या इंधन दरवाढीविरोधात माकपाकडून सोलापुरातील गुरुनानक चौकात आंदोलन करण्यात आलं.
जेष्ठ मार्क्सवादीनेते नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. महावितरणने वीज बिल तोडणी तात्काळ नाही थांबवली तर येत्या २६ मार्चला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा माकपने दिला आहे. या आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात माकप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.