जनतेज न्युज

वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाळीसगाव चौफुली जवळच दोन दिवसांपूर्वी दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये अपघात झाला होता, या अपघातानंतर दुचाकी चालक हा आपली दुचाकी सोडून त्याठिकाणाहून पसार झाला होता.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन च्या पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांना अपघातातील दुचाकी ही बिना नंबर प्लेट असल्याचे आढळून आले. वाहनाच्या चेसी नंबर वरुन पुढील तपास केला असता, ही गाडी काही दिवसांपूर्वीच चोरी ला गेली असल्याची माहिती मूळ मालकाकडून चाळीसगाव रोड पोलिसांना देण्यात आली.
याबाबत तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली असता धुळ्यात वाहन चोरणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती समोर आली. व त्या टोळीतील बबल्या आयुब शेख याने ही दुचाकी चोरली असल्याचे देखील गुप्त माहिती दारा मार्फत पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बबल्या आयुब शेख या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने संबंधित दुचाकी चोरल्याची असल्याची कबूली देखील त्याने दिली आहे. पोलीस आयुब शेख याची आणखी चौकशी करून वाहन चोरणाऱ्या टोळी संदर्भातील माहिती घेत आहेत.