जनतेज न्युज

शरद तांदळेंना अटक करा; वारकरी क्रांती सेनेची मागणी

प्रतिनिधी , अहमदनगर : शरद तांदळे यांनी काही दिवसांपुर्वी वारकरी संप्रदायाची टिंगलटवाळी केल्याप्रकरणी शरद तांदळे यांना लवकरात लवकर अटक करा तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी जोर घेते आहे.शरद तांदळे यांना अक्कल नावाची गोष्ट नाही अशा भाषेत वारकरी क्रांती सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई राऊत यांनी शरद तांदळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.शरद तांदळे विरूध वारकरी संप्रदाय असा वाद नव्याने आता समोर येऊ लागला आहे.