जनतेज न्युज

स्वतःला पेटवून घेतलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू ; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार..!

प्रतिनिधी , बीड: भूसंपादनाच्या प्रकरणात १५ वर्षांपासून पाठपुरावा करूनही बीड पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने पाली येथील शेतकरी अर्जुन साळुंके यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना काल दुपारी पाटबंधारे कार्यालयासमोर घडली होती. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत साळुंके यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार दिला आहे.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसंग्रामकडून संबंधित उपजिल्हाधिकारी , पाटबंधारे विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी करण्यात आलीय