प्रतिनिधी, वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कायम गजबजलेले असली तरी तिला एक शासकीय झालर असते. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि विविध कारणांनी कार्यालयात येणारे सामान्य माणसं, फाईलचे गठ्ठे नेणारे शिपाई, कर्मचारी यांची धावपळमुळे या इमारतीचे वरांडे, परिसर गजबजलेला असतो. मात्र ठिकठिकाणी शोभेची रोपे, तसेच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तिरंगा ध्वजाच्या रंगात केलेली विद्युत रोषणाई सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
