प्रतिनिधी , हिंगोली : इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क शारीरिक तपासणी शिबिरात 160 हून अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदवला. आजच्या धावपळीच्या युगात पत्रकारांना स्वतःच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबियाच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली शहरात निशुल्क शारीरिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाभरातील पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते त्यांचे कुटुंबीय यांची निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन देखील करण्यात आलं.
