जनतेज न्युज

हिवाटीचा रस्ता अडवल्याने सोयाबीन सह तुरीच्या गंज्या शेतातच पडून महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी……

प्रतिनिधी , वाशिम : वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेला वहिवाटीचा रस्ता शेजारील शेतकऱ्यांने अडवल्यामुळे अनेक, शेतकऱ्यांच्या सोयाबीन सह तुरीच्या गंज्या शेतातच पडून आहेत.यासंदर्भात तहसीलदार वाशिम यांना वेळोवेळी निवेदन देऊनही तहसीलदार यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान सोयाबीन, आणि तुरीच्या गंज्या शेतात असल्याने वन्यप्राणी गंज्याचं मोठं नुकसान करीत आहेत. त्यामुळं लवकरात लवकर महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी भटउमरा येथील शेतकरी करीत आहेत…..