जनतेज न्युज

हे सुडाचे राजकारण प्रस्थापित पक्षांनी थांबवलं पाहिजे – रविकांत तुपकर

प्रतिनिधी, बुलडाणा : सध्या राज्य सरकारचे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाचे अवलोकन जर केलं तर लाज वाटते.विधान मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या बाबत अजिबात चर्चा होताना दिसत नाही.थँक लेस गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होते. भावनिक केल्या जाते.शेतकऱ्याचे पोरगं सरकारच्या नावाने आत्महत्या करतो तरी सुद्धा सरकारला लाज वाटत नाही.प्रस्तावित पक्षांकडून आमच्यासारख्या तरुण पोरांनी किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुणांनी  या राजकारण्यांपासून काय आदर्श घेतला पाहिजे.प्रस्थापित पक्षांचे जबाबदार नेते वागणार असतील तर या राज्याला एका नव्या पर्याय देण्याची गरज आहे असे मला सारखे कार्यकर्त्यांचे मत आहे.पंजाब मध्ये जसा आम आदमी पार्टीनं निवडणूक लढली आणि पंजाबच्या जनतेने सगळ्या प्रस्थापितांना बाजूला सारून एक नवा पर्याय म्हणुन आम आदमी पक्षाच्या रूपाने पुढे आणला तसेच वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे.सगळ्यात प्रस्थापित राजकीय पक्षांना लोक कंटाळले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असं नव्हतं, आता सुडाचे राजकारण आहे.. सामान्य माणसाला त्याचा काही फायदा नाही.आणि लॉक डाऊन मुळे, कोरोनामुळे सामान्य नागरिक उध्वस्त झाले आहे.. माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे.. आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळी उठल्यापासून नेत्यांकडून पत्रकार परिषदेमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जातात.महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे,शाहू फुले आंबेडकर यांचा आहे, यशवंतराव चव्हाणांचा वसंतदादांचा हा महाराष्ट्र आहे. हा संस्कार धीशटीत महाराष्ट्र आहे.आता या महाराष्ट्राच्या राजकारणावर चे संस्कार कुठे गेले असे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे.हे सुडाचे राजकारण प्रस्तावित पक्षाने थांबवलं पाहिजे.आणि सामान्य माणसाच जगणे सुखकर केले पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.