प्रतिनिधी , सध्या जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी झाला आहे. मात्र असे असले तरी रेस्टॉरंट केवळ 4 वाजे पर्यंतचा सुरू ठेवण्याचे सरकरचे आदेश आहेत. ही वेळ हॉटेल,रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी सोईची नाही.या वेळेमुळे व्यवसाय पूर्णतः बुडाला असून रेस्टॉरंट व्यवसायिक व काम करणारे कामगार अडचणीत आले आहेत.
प्रादुर्भाव कमी झाल्याने आता हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अमरावती मध्ये हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी व कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला…
