जनतेज न्युज

२०२०-२१ चा धुळे मनपाचा अर्थसंकल्प महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे सुपूर्द.

प्रतिनिधी, धुळे: धुळे महापालिकेचा ७६४ कोटी ४ लाख १६ हजार रुपयांचा कुठलीही करवाढ नसलेला सन २०२०-२१ चा
अर्थसंकल्प आज धुळे मनपा स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे यांनी अंतिम मंजूरीसाठी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हाती सोपवला आहे.
स्थायी समितीव्दारे धुळे मनपाचे उत्पन्न वाढावे यासाठी ३६ कोटी ४५ लाखाच्या शिफारसी सुचवल्या आहेत. धुळेकरांवर कोणतीही करवाढ न करता, विकास कामांसह विविध नविन योजनांचा समावेश या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात असल्याची माहिती महापौर चंद्रकांत सोनार यांनी याप्रसंगी दिली.
धुळे महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा कोरोना संकटामुळे अद्यापही अंतिम मंजूरीसाठी प्रतिक्षेत आहे. अर्थसंकल्प मंजुरीपुर्वी प्रशासनाने स्थायी समिती समोर गेल्या महिन्यात सादर केला होता.सन २०९-२० चे सुधारीत आणि सन २०२०-२१ चे मुळ अंदाजपत्रक स्थायी समिती सदस्यांशी चर्चा करुन नगरसेवक निधी म्हणून प्रत्येकी २० लक्ष अशी एकुण १६ कोटी रुपयांची तरतुद सुचविण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.