प्रतिनिधी , धुळे; धुळे तालुक्यातील निमगूळ येथील प्राची माळी हिची काही दिवसांपूर्वी हत्या करूनंतीला विहिरीत फेकण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत तिचे मारेकरी अद्यापही सापडलेले नाही. मारेकऱ्याचा शोध घ्यावा या मागणीसाठी आज आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी आरक्षण बचाव समितीचे तसेच माळी समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप देवरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, चिमुकली प्राची माळी हीचा काही दिवसांपूर्वी निर्घृण पने हत्त्या करून तिचा मृतदेह हा विहिरीत फेकण्यात आला. हे दुर्दैवी कृत्य करणाऱ्यास तात्काळ अटक करण्यात येऊन त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, तसेच मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अश्या विविध मागण्यांसाठी आज हे आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आक्रोश धरणे आंदोलन वेळी दिलीप देवरे, बी.एन. बिरारी, रामकृष्ण खलाणे, प्रा . आण्णा माळी, ज्ञानेश्वर माळी, मोहन मोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
