जनतेज न्युज

भाजपाच्या कार्यालयातून एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेसोबत त्यांचे पुञ निखिल खडसे यांची फ्रेम देखील काढण्यात आली…

जळगाव प्रतिनिधी- : जळगाव येथील भाजपच्या कार्यालयातून एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेसोबत त्यांचे पुत्र तथा खासदार रक्षा खडसे यांचे पती दिवंगत निखील खडसे यांची फ्रेम देखील काढण्यात आल्यामुळे याबाबत नाथ फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत भाजपला स्व. निखील खडसे यांच्या फोटोची अ‍ॅलर्जी कशासाठी ? असा प्रश्‍न विचारला आहे.नुकतेच भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे जळगाव येथील पक्षाच्या वसंत स्मृती या जिल्हा कर्यालयातील दर्शन भागात असणारी त्यांची प्रतिमा आज काढण्यात आली. ही बाब स्वाभाविक असली तरी यासोबत त्यांचे पुत्र तथा भाजपचे दिवंगत जिल्हा परिषद सदस्य निखील खडसे यांची फ्रेम देखील काढून टाकण्यात आली. याच्या विरूध्द आता खडसे समर्थक आक्रमक झाले असून सोशल मीडियात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. याबाबत नाथ फाऊंडेशनने भाजपवर टीका केली आहे. स्व.निखिलदादा खडसे यांच्या स्मृतीनिमित्त सात वर्षांपुर्वी लावण्यात आलेली फ्रेम काढण्यात आल्याच कळाले. सदरील घटना ही अतिशय क्लेशदायक, दु:खदायक मनाला वेदना देणारी आहे.