जनतेज न्युज

ठाण्यामध्ये आदिवासी बांधवांनी केला आदिवासी दिन जल्लोषात साजरा

प्रतिनिधी , ठाणे : गेली दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट जागतीय आदिवासी दिवस साजरा करता आला नव्हता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले आहे. त्यासाठी आज आदिवासी बांधवांकडून आज 9 ऑगस्ट  आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.  यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी 2 हजार च्या संख्येने बाईक रॅली करण्यात आली होती. यावेळी आदिवासी बांधवांकडून वाद्य वाजवून तरफा नृत्य सादर करण्यात आले. तसेच आपल्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार करून आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आले.