हे सरकार मराठवाड्याच्या मुळावर उठले आहे- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात
प्रतिनिधी , जालना : मराठवाडयात सर्व जिल्हे आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या जिवणात पिण्याच्या पाण्याचे आठराविश्व दारिद्रय दुर व्हावे आणि सर्वांना मुबलक पाणी मिळावे, हे लक्षात घेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तत्कालीन सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड योजणा मंजूर केली होती या योजनेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार होती परंतु आता ही योजना बंद केल्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ पूर्णपणे संपविण्याचे देवेंद्र फडणवीस सरकारचे स्वप्न अपूर्ण राहणार असून विद्यमान महा विकास आघाडी सरकारने ही योजना बंद करून मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत एवढेच नाही तर महा विकास आघाडी सरकार मराठवाड्यातील जनतेच्या मुळावर उठले आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
