प्रतिनिधी , सांगली: सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जी मुले अनाथ आहेत किंवा जी मुले अनाथ आश्रम किंवा संस्थांमध्ये आहेत अशा मुलांनी किंवा संस्था चालकांनी आपल्याकडील मुले अनाथ असल्याचा पुरावा आणि प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.
या विहित कालावधीत आपण अनाथ प्रस्ताव सादर केल्यास त्या मुलाला अनाथ प्रमाणपत्र दिले जाणार असून या अनाथ प्रमाण दिले जाणार आहे याचा फायदा त्या मुलाला आपले नागरिकत्व दाखला आणि 1 टक्का नोकरीमध्ये आरक्षणासाठी लाभ मिळण्यासाठी होणार असल्याने 14 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपले प्रस्ताव महिला बालविकास कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहनही सुवर्णा पवार यांनी केले आहे
