जनतेज न्युज

आदिवासी जात वैधता कार्यालय धुळ्याला स्थापित करा; आदिवासी विकास संघटनेची मागणी…

प्रतिनिधी : धुळे जळगाव दोन्ही जिल्हे मिळून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास संघटनेने आज धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असून याठिकाणी धुळे व जळगाव येथील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध कामांसाठी पोहोचत असताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांचे रस्त्यामध्ये अपघात होऊन मृत्युमुखी पडल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. तसेच नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये बहुतेकदा नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विकास संघ असोसिएशन महाराष्ट्र संघ तर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या निवेदनामध्ये हे कार्यालय धुळ्यामध्ये स्थापित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

नंदुरबार व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांना जवळ असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये हे कार्यालय स्थापन केल्यास अनुसूचित जमातीच्या तीनही जिल्ह्यांमधील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे निवेदन करत्यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे.