प्रतिनिधी, हिंगोली- कोरोना सारख्या महामारी मध्ये 24 तास वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार हिंगोलीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. शहरात एका स्वयंसेवी संघटनेच्या वतीने आयोजित रोग निदान व रक्तदान शिबिरामध्ये हा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या डॉक्टर्स चा सत्कार केला. त्याच बरोबर शिबिराच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
