प्रतिनिधी, खामगांव : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठल्याच प्रकारचा तोडगा न निघाल्याने त्याचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसताना पाहायला मिळत आहे.. आज बारावीचा पहिला पेपर झाला, या पेपरला पोहोचण्यास अनेक विद्यार्थ्यांना बसेस नसल्यामुळे उशीर झाला.तसेच अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या या संपावर लवकरात लवकर तोडगा काढून बसेस सुरू कराव्यात असा टाहो विद्यार्थी फोडताना पाहायला मिळत आहेत. बस नसल्याने आज अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचले, त्यामुळे या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा सोडवायला मिळाला आणि पेपर सुटल्यानंतरही अनेक विद्यार्थी खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे असल्याचं पाहायला मिळालं.
