प्रतिनिधी, मुंबईत : on गिरीष महाजन
* लोकसभेच्या स्पिकरची निवडही आवाजी मतदान किंवा हेड काऊन्टद्वारे होत असते. त्याच प्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षाची निवडीबाबत नियमावली बनवण्याचा अधिकार विधीमंडळाचा आहे. ज्या काही नियम अटी त्यात देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ही निवड होतं आहे. तरी देखील कुणलाही न्यायालयत जाण्याचा अधिकार आहे.
ON ओबीसी
OBC आरक्षणाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्या पद्धतीने नियम व कायदा केलेला आहे त्या धर्तीवर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यात ग्राम विकास विभाग, नगर विकास, निधी व विकास या सर्वानी बसून एक प्रस्ताव तयार केलेला आहे. यात मुख्यमंत्री यांनीही काही सूचना केलेल्या आहेत. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास त्याचं बिल सोमवारी सभागृहात येईल.
on राज्यपाल
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार दुपारची वेळ त्यांनी दिली. ९ मंत्र्यांनी भेट घेऊन निवेदन दिलं, यात अध्यक्षाची निवड करायची असल्याचं मुद्दा उपस्थित करत वेळ मागितला. तसेच १२ आमदारांचा मुददाही फार काळ रखडला आहे. ६ महिन्याचा कालावधी उलटला असून फार काळ त्यांना लांब ठेवता येणार नाही. त्यावरही राज्यपालांनी निर्णय घ्यावा. त्यांच्यावर तो अन्याय कारक आहे. नियमावलीच्या आधीन राहून ही नाव दिलेली आहेत।
