जनतेज न्युज

राज्य सरकारने ओबीसींची फसवणूक करू नये – हरिभाऊ राठोड

प्रतिनिधी, यवतमाळ : ओबीसींच्या राजकिय आरक्षणासाठी राज्य सरकार पुन्हा दुसरा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापूर्वी च्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असे होत असताना अटरणी जनरल चुकीचे सल्ले का देत आहे. राज्य सरकारने दुसरा कायदा आणून ओबीसी समाजाची फसवणूक करू नये, अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.