जनतेज न्युज

भगतसिंह कोशारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून काढण्यात याव अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन छेडण्यात येईल

प्रतिनिधी, ठाणे : रोजी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविद यांना पत्र लिहून करण्यात आली. भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रीतपणे ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेशजी नार्वेकर यांची भेट घेऊन राष्ट्रपतींना पाठवायचे पत्र त्यांच्या सुपूर्द केले.

सौ. निशा गवळी श्रीम. अंजली पाटील* *कु. परशुराम आंबेरकर आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय मराठा महासंघातर्फे सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पत्र देऊन राज्यपालांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी या पत्राची व महाराष्ट्राच्या लोकभावनेची दखल घेऊन तातडीने भगतसिंह कोशारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन छेडण्यात येईल.